Pune Fake Suicide : कोट्यावधींच्या कर्जातून सुटण्यासाठी हिरे व्यापाऱ्याचा मृत्यूचा बनाव; दोन चपलांनी फोडले बिंग















Pune Fake Suicide : पुणे : तब्बल 16 कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका हिरे व्यापाऱ्याने कर्जदारांपासून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) उघडकीस आली आहे. खडकवासला धरणाच्या काठावर मोबाईल आणि सुसाईड नोट ठेवून बेपत्ता (Missing) झालेल्या व्यापाऱ्याचा हा डाव अखेर पोलिसांनी उधळून लावला. विशेष म्हणजे, घटनास्थळी वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या दोन चपलांमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हिरे व्यापारी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता व्यापाऱ्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन खडकवासला धरण परिसरात आढळले.

पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता धरणाच्या काठावर एक पिशवी सापडली. त्यामध्ये व्यापाऱ्याचा मोबाईल आणि आत्महत्येची चिठ्ठी होती. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटत होते. मात्र, घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना संशयास्पद बाब आढळली. व्यापाऱ्याच्या दोन चपला वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या होत्या. एक चप्पल धरणाच्या काठावर तर दुसरी काही अंतरावरील झुडपात आढळली. यामुळे पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली.

तपासादरम्यान संबंधित व्यापाऱ्यावर सुमारे 16 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले. एमसीएक्स आणि शेअर ट्रेडिंगमधील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे तो अडचणीत सापडला होता. कर्जदारांच्या तगाद्यातून सुटका मिळवण्यासाठीच त्याने स्वतःच्या मृत्यूचे खोटे नाटक रचल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व्यापारी खडकवासला येथून सातारा, नगर, सुपा आणि अकोला परिसरात सतत ठिकाणे बदलत होता. स्वतःचा मोबाईल वापरण्याऐवजी तो इतरांच्या फोनवरून संपर्क साधत होता. मात्र, अखेर त्याने एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून पत्नीशी संपर्क साधला. याच फोन कॉलमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.



व्यापाऱ्याच्या पत्नीने पोलिसांना कॉलची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित क्रमांकाचा माग काढला आणि व्यापाऱ्याला ताब्यात घेतले. आत्महत्येचा आभास निर्माण करण्यासाठी ठेवलेला मोबाईल, सुसाईड नोट आणि घटनास्थळावरील परिस्थिती हा सर्व सुनियोजित कट असल्याचे उघड झाले.

आत्महत्येचे नाटक करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यापाऱ्याचा डाव अखेर दोन चपलांमुळे फसला आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.






Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.