Chandrashekhar Bawankule : कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत

 महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय; मोजणीसाठी ९० आणि ३० दिवसांचा नवा 'डेडलाईन' फॉर्म्युला


मुंबई : राज्य शासनाने जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणात मोठे बदल करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता कुटुंबातच झालेल्या वाटणीची मोजणी करावयाची असल्यास २०० रुपयात होईल. तर 'नियमित मोजणी' ९० दिवसांत आणि 'द्रुतगती मोजणी' ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे मोजणी प्रक्रियेतील उशीर आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयानुसार, ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये, तर शहरी भागात १ हेक्टरपर्यंत ३ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.




दरपत्रक असे


- कौटुंबिक वाटणी मोजणी : कोर्ट वाटप किंवा संमतीने होणाऱ्या मोजणीसाठी प्रति पोटहिस्सा अवघे २०० रुपये शुल्क.


- ग्रामीण मोजणी दर : २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये, तर द्रुतगतीसाठी ८ हजार रुपये शुल्क.


- शहरी मोजणी दर : १ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३ हजार रुपये, तर द्रुतगतीसाठी १२ हजार रुपये शुल्क.



- पुनर्भेट शुल्क : अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास मूळ फीच्या ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपये दंड.


- भूमापक गैरहजर राहिल्यास सवलत : मोजणीच्या दिवशी अधिकारी अनुपस्थित राहिल्यास अर्जदाराला कोणतेही पुनर्भेट शुल्क नाही.


- गुंठेवारी मोजणी : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांच्या मोजणीसाठी दीडपट शुल्क.


- उच्चतपासणी फी : कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास तपासणीसाठी ३ ते ५ पट अधिक शुल्क.


- सरकारी संस्थांना सवलत : निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५० टक्के, तर पूर्णतः शासकीय जमिनींना ७५ टक्के सवलत मिळेल.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक