Chandrashekhar Bawankule : गोमाता संवर्धनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; भाविकांच्या सुविधेसाठीही तरतूद


मुंबई : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी, तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पंढरपूरच्या यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला.



मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे. आणि 'गोमाता पालन-संवर्धन केंद्र' याठिकाणी उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी (गोमाता संवर्धन व भाविकांची सुविधा) या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील. ज्या कामासाठी जमीन दिली आहे, केवळ त्याच कामासाठी तिचा वापर करता येईल; इतर कोणत्याही तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल