Tuesday, June 16, 2026

Navi Mumbai Crime : पतीने केला पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप वार ; दोघींचा जागीच मृत्यू

Navi Mumbai Crime : पतीने केला पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप वार ; दोघींचा जागीच मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार सोमवारी पहाटे घडला. एका जावयाने आपल्या पत्नी आणि सासूवर चाकूचे वार करून क्रूरपणे हत्या केली. अशी खळबळजनक घटना समोर अली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

नक्की प्रकार काय ? आरोपी आरोपी बाळू निकाळजे (वय27) याने पाच ते सहा वर्षांपूर्वी अपर्णा गोसावी या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. लग्न झाले त्यानंतर बाळू हा नेरुळमधील शिरवण येथे पत्नी आणि सासू मालन गोसावी (वय55) यांच्यासोबत राहत होता. पण दरदिवसा त्यांच्या घरात काहीना काही कारणांवरून वाद होत असायचे. फक्त वाद नाही तर आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होते असत.भांडणाला कंटाळून आरोपी काही दिवसांसाठी बाहेरगावी राहायला गेला. मात्र तीन दिवसानंतर तो परत सासूच्या घरी राहायला आला.

स्थानिक नागरिकांनी सांगितल्या प्रमाणे : आरोपी पहाटे घरी आला. तो घरी गेल्या नंतर थोड्या वेळाने त्याच्या घरातून सासू आणि पत्नी च्या ओरडण्याचा आवाज आला. शेजाऱ्यांनी जाऊन पहिले तर बाळू त्याच्या सासू आणि पत्नी वर चाकूने सपासप वर करत होता. शेजाऱ्यांनी त्याला जाऊन अडवलं परंतु दोघीही गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या बाबत माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला तातडीने अटक केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा