Pritam Chakraborty : प्रसिध्द संगीतकारचा 'त्या' पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ; निवृत्तीची चर्चा रंगली

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती (Music composer Pritam Chakraborty) यांनी १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या एका भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेली दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणाऱ्या प्रीतम यांच्या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रीतम यांनी लिहिले की, "सर्व शुभेच्छांसाठी धन्यवाद. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उत्तर देणे शक्य नसले तरी माझे मनःपूर्वक आभार स्वीकारा. आज मी स्वतःला काही वर्षे वेगळ्या पद्धतीने जगण्याची भेट देत आहे. आयुष्यात जे काही राहून गेले, ते पुन्हा अनुभवण्याची वेळ आली आहे. आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे, जो अनेक वर्षांपासून प्रलंबित होता."


पुढे त्यांनी म्हटले की, "मेनस्ट्रीम हा एक सुंदर प्रवास होता. मात्र, मला नेहमीच न शोधलेल्या वाटांविषयी अधिक उत्सुकता वाटत आली आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद."


या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रीतम यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र त्यांनी संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे कुठेही स्पष्टपणे नमूद केलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट नव्या आयुष्याच्या टप्प्याची किंवा वेगळ्या सर्जनशील प्रवासाची सुरुवात असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.



सध्या ५५ वर्षांचे असलेले प्रीतम हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहेत. अरिजीत सिंह यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांच्या संगीताने सजलेली 'केसरिया', 'चन्ना मेरेया', 'हवाएं', 'तुम से ही', 'तू जाने ना', 'कबीरा', 'बलम पिचकारी', 'बदतमीज दिल' यांसारखी गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.





दरम्यान, आगामी कॉटकेल २ (Cocktail 2) चित्रपटातील गाण्यांनाही प्रीतम यांनी संगीत दिले असून हा चित्रपट १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना

मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या

Abhishek & Aishwarya ; बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीचा न्यूयॉर्क मधील फोटो व्हायरल, विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम !

मुबई : अलीकडेच, बॉलीवूड मधील प्रसिद्ध स्टार ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसले

"तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला..."; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे

'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'जमाई राजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांमध्ये पोहोचलेल्या दिग्गज आणि

Aishwarya Thackeray : राजकारण नाही, आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री! बाळासाहेब ठाकरेंचा नातू YRF च्या बिग बजेट चित्रपटात झळकणार

मुंबई : ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय

Salman Khan : सलमान खानच्या मध्यरात्रीच्या पोस्टने उडवली खळबळ; 'डर गया... मर गया' म्हणत नेमकं काय सांगितलं?

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील

Marathi Movie : "मामाच्या गोव्याला जाऊया" चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अंकुश चौधरीचा खतरनाक 'डॉन' अवतार अन् तगडी स्टारकास्ट!

बॉलीवूडच्या 'धम्माल'ला देणार टक्कर! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्स अन् ॲक्शनचा