Coastal Road : दहिसर ते भांईदर विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाचा सल्ला सुमारे ५२ कोटींचा

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड -काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड निवड


मुंबई (विशेष प्रतिनिधी)

विस्तारीत कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पांतर्गत दहिसर (पश्चिम) येथील लिंक रोड (Link Road) पासून मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पश्चिम) पर्यंतच्या ४५ मीटर रुंद उन्नत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. किनारी रस्ता शेवटचा टप्पा असलेल्या प्रकल्प कामांसाठी सल्लागार म्हणून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मेसर्स निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (संयुक्त भागीदार) कंपनीची निवड करण्यात आली अहे. यासाठी ५२ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.



वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते दहिसर आणि पुढे भाईंदर पर्यंत कोस्टल रोडचा विस्तार केला जात आहे. यातील 'दहिसर (पश्चिम) लिंक रोड ते भाईंदर (पश्चिम) पर्यंत ४५ मीटर रुंद उन्नत मार्ग बांधणे बांधण्यात येत आहे. या उन्नत मार्गाची अर्थात पुलाची एकूण लांबी ४.५८ कि.मी (४+४ मार्गिका) आहे. या एकूण लांबीतील १.४५ कि.मी लांबी ही बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत असून ३.१३ कि.मी लांबी ही मिरा-भाईदर महानगरपालिका हद्दीमध्ये आहे. हे काम आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून करण्यात येणार आहे. या प्रकल्प कामासाठी यापूर्वी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून याकरता आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. या प्रकल्प कामाशी निगडीत कंत्राटदाराने सादर केलेली सर्व संकल्प चित्रे, आरखडे, संरचना यांची तपासणी तसेच प्रकल्पात अंतर्भूत कामांचे दैनंदिन पर्यवेक्षण, प्रकल्पात वापरण्यात येणा-या सामुग्रीची गुणवत्ता तपासणे, प्रकल्पात नमूद बांधकामांची गुणवत्ता तपासणे, प्रकल्प कंत्राटदाराने सादर केलेल्या देयकाची तपासणी करणे व प्रकल्प निविदेत तथा शुध्दीपत्रकात नमूद असलेल्या कामाच्या व्याप्तीनुसार देखरेख करणे इत्यादी कामे अंतर्भूत असतील.



या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेसर्स निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (संयुक्त भागीदार कंपनी) पात्र ठरली असून ५२ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध