सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ७३३.२८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) आव्हान आणि सागरी सुरक्षेचा वाढता विस्तार लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस दलाला अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.
मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू ...
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या एकूण ७३३.२८ कोटी रुपयांच्या खर्चात ६० टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. हे लक्षात घेऊन या निधीचा मोठा हिस्सा पोलीस दलात 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केला जाईल. याशिवाय, मुंबईसह महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सागरी सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाईल, तसेच तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रग्जविरोधी मोहीम अधिक बळकट केली जाणार आहे. त्याशिवाय आधुनिक शस्त्रे आणि अत्याधुनिक वाहने या निधीतून खरेदी केली जातील.






