Mohsin Akhtar Mir : उर्मिला मातोंडकरचा एक्स-हसबंड मोहसिन अख्तरचा दुसरा विवाह; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचे एक्स-हसबंड मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir ) यांनी दुसरे लग्न (Second Marriage) केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या निकाह समारंभाचे फोटो व्हायरल (Viral) होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Urmila Matondkar Ex-Husband Mohsin Akhtar Married Again)


उर्मिला आणि मोहसिन यांचा विवाह 4 फेब्रुवारी 2016 रोजी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि 2024 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.



घटस्फोटानंतर सुमारे दोन वर्षांनी मोहसिन यांनी निधा भट्ट हिच्याशी निकाह करून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केले. "अल्लाहने मला तुझ्या प्रेम आणि प्रामाणिकपणाचे सुंदर वरदान दिले आहे," असे भावनिक शब्द त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहेत.


लग्नसोहळ्यात मोहसिन पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत तर निधा सोनेरी आणि आयव्हरी रंगाच्या शरारामध्ये आकर्षक दिसत होती. या फोटोवर चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



दरम्यान, मोहसिन यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत उर्मिला मातोंडकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उर्मिला सध्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर