Ramdas Athawale : तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि आमदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राजकीय भविष्याचा विचार करून आंबेडकरी विचार निवडावा

मुंबई : "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी बंडखोरी करून त्रिपुरातील 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना असती, तर त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते. मात्र, आता तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि बंडखोर आमदारांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असलेल्या आरपीआयमध्ये सामील व्हावे", असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी केले.



पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दबावामुळे आतापर्यंत पक्षातील खासदार बंड करण्यास धजावत नव्हते. मात्र, आता सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे नेतृत्व नाकारले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व झुगारून त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. तृणमूलचे खासदार बंड करणार आहेत, हे जर मला आधी कळले असते, तर ते सर्व खासदार माझ्या ओळखीचे असल्याने मी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते." २० खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता उर्वरित तृणमूलच्या खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन त्यांनी केले.



६० बंडखोर आमदारांनाही निमंत्रण

खासदारांपाठोपाठ पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या ६० आमदारांनीही ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारून बंड केले असून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या आमदारांचा उल्लेख करत आठवले म्हणाले की, तृणमूल काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा.
Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला