Pune Water Cut : पुणेकरांना मोठा झटका! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; धरणसाठा घटल्याने महापालिकेचा कडक निर्णय

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने आणि धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पुणे महापालिकेने आजपासून म्हणजेच सोमवार १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १५ जून उलटूनही मॉन्सून सक्रिय न झाल्याने प्रशासनावर पाणी वापरावर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे. (Pune Water Cut)



सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे नवीन नियोजन :


पावसाचा विलंब आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे नवीन नियोजन जाहीर केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आता दिवसाआडच नळाचे पाणी मिळणार असून, अनेक भागांमध्ये पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना त्यांच्या भागाचे सविस्तर वेळापत्रक महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. (Pune Water Cut)


यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. सध्या पुणे महापालिका दररोज सुमारे १६०० एमएलडी पाणीपुरवठा करते. मात्र उपलब्ध साठा ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी हा पुरवठा ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी मिळणाऱ्या उत्तर-पूर्व पुण्यातील काही भागांना तांत्रिक कारणांमुळे सध्या या कपातीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. (Pune Water Cut)



महापालिकेचे नागरिकांना आवाहन :


महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. नळ व टाक्यांची गळती तातडीने दुरुस्त करणे, अनधिकृत नळजोडांची माहिती प्रशासनाला देणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक १८००-१०३०-२२२ उपलब्ध करण्यात आला आहे. (Pune Water Cut)



पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे :


तसेच पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी टँकरचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मॉन्सूनची प्रतीक्षा आणि घटता धरणसाठा यामुळे पुणेकरांसमोर पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. (Pune Water Cut)



जाणून घ्या कोणत्या भागात कधी पाणी येणार :


पहाटे आणि सकाळी पाणी येणारे भाग: शहरातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पहाटेपासूनच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. यामध्ये बोपोडी परिसरात सकाळी ४.०० ते १०.०० या वेळेत पाणी येईल. धाकुडवस्ती, कपिल मल्हार परिसर आणि बाणेर गावठाण भागात सकाळी ४.३० ते ८.३० अशी वेळ असेल, तर सुतारवाडी गावठाण आणि पाषाण पार्क भागात पहाटे ४.३० ते ७.३० या वेळेत पाणी मिळेल. आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, वैकुंठ स्मशान परिसर, समप म भवन, अमर सोसायटी, कोपन गल्ली, मोढ कॉलनी, विठ्ठलवाडी, माकेकर प्लॉट, राजपूत वसाहत आणि एरंडवणे गावठाण या भागात पहाटे ५.०० ते ११.०० या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल. खडकी छावणी भाग आणि मुळा रोड परिसरात सकाळी ६.०० ते ११.३० अशी वेळ देण्यात आली आहे. याशिवाय सुतारगाव भागात सकाळी ७.३० ते ९.३०, मोहननगर भागात पहाटे ७.३० ते १२.३० आणि एसटीएम, अभिमानश्री सोसायटी व चतु:शृंगी नगर परिसरात सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० या वेळेत नळाला पाणी येईल. (Pune Water Cut)



दुपारी आणि संध्याकाळी पाणी येणारे भाग: दुपारच्या सत्रात बाणेर रोडची उजवी बाजू आणि माळा पाणीपुरवठ्यातील सर्व भागांमध्ये दुपारी ११.०० ते ५.३० या वेळेत पाणी उपलब्ध असेल. सुस रोड परिसरात सकाळी ११.३० ते दुपारी १.३०, तर पंचवटी भागात दुपारी १२.३० ते ४.०० या वेळेत पाणी येईल. मोरेलगर, अशोकनगर, रेंजहिल आणि खडकी परिसरात दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत पाणी सुटणार आहे. संपूर्ण बालेवाडी गावठाण आणि बालेवाडी परिसरात दुपारी २.०० ते ८.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, वडारवाडी, शिवाजीनगर आणि रेखवे गल्ली भागात दुपारी ३.०० ते रात्री ८.०० या वेळेत पाणी मिळेल, तर औंध गाव, प्रीतम सोसायटी, इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत परिसरात दुपारी ३.०० ते रात्री १०.०० या वेळेत पाणीपुरवठा होईल. (Pune Water Cut)


रात्री पाणी येणारे भाग आणि विशेष नियोजन: काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा केला जाईल. यामध्ये जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर आणि आशानगर या भागांसाठी रात्री ८.०० ते ११.३० अशी वेळ देण्यात आली आहे. चिखलवाडी परिसरात रात्री ११.०० ते १.०० या वेळेत पाणी येईल. तर वीरभद्रनगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल आणि चाकणकर मळा या परिसरांमध्ये संध्याकाळी ५.३० ते रात्री २.३० या प्रदीर्घ वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Pune Water Cut)


टँकर आणि दिवसाआड पाणी येणारे भाग: शहरातील काही भागांसाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. ससे गाव परिसरामध्ये सम आणि विषम तारखेनुसार फक्त टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जाईल. तर दुसरीकडे, वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवेपर्यंतचा संपूर्ण भाग), रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे, तसेच औंधकरवस्तीतील लक्ष्मीनगर धाबडे आणि फक्त लक्ष्मीनगर या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचे दैनंदिन वेळापत्रक पूर्वीसारखेच कायम राहील, मात्र या भागात आता एक दिवसाआड (दिवसाआड) पाणी दिले जाईल. (Pune Water Cut)

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या