Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; 12 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट













मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून मान्सूनची प्रगती मंदावल्याने अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे. अशात हवामान विभागाने 15 जूनसाठी राज्यातील 12 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

कोकणात उष्णता वाढणार




कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिर जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात उष्णता आणि हलक्या पावसाची शक्यता


नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात दुहेरी परिस्थिती


कोल्हापूर आणि सातारा येथे उष्णतेचा यलो अलर्ट आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.


मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव कायम


छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर परभणी, बीड, हिंगोली,नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा इशारा

अमरावती जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाहन

राज्यातील बहुतांश भागांत उष्णता, दमट वातावरण आणि अधूनमधून वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या