BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून सांगत असले की नाले सफाई शंभर टक्के झाली आहे. मात्र, मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश नाल्यातील गाळ अद्याप काढलाच नसल्याचे विविध भागांमधील गाळ आणि कचऱ्याने भरलेली छायाचित्रेच प्रदर्शित करत यंदा मुंबईची तुंबई होणारच असल्याचा दावा केला आहे. नालेसफाई शंभर टक्के तर गाळ आाणि कचऱ्याने नाले तुडुंब भरलेले कसे असाही सवाल करतच त्यांनी पावसाला विलंब झाल्याने याची मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी, असे आवाहन केले आहे.



पावसाळा तोंडावर आला तरी नाले सफाई झाली असल्याचा दावा फोल ठरविणारे छायाचित्रे दाखवत मनसेचे महापालिका गटनेते, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी शनिवारी जाहीर पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.मुंबईतील वडाळा, धारावी तसेच उपनगरातील भारत नगर, नाहूर गोवंडी, कुर्ला, पंचशील नगर अशोक नगर, क्रांती नगर - कुर्ला वाकोला, मानखुर्द, चेंबूर, मोगरा नाला, केशव पाडा नाला आदीं नाले गाळाने तसेच कचऱ्याने भरले असल्याचे फोटो बॅनरच्या माध्यमातून किल्लेदार यांनी दाखविले.


ज्यादिवशी सत्ताधारी नाले पाहणीकरिता जातात, त्या आधी महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांना सूचित करतात. मग ते सर्व मशीनरी लावून तात्पुरता गाळ काढत असल्याचे दाखवतात. आम्ही सातत्याने पालिकेत या प्रश्नावर आवाज उठवायला जातो. पण मात्र आम्हांला बोलू दिले जात नाही, असे त्यांनी सांगितले.भाजपचेच सहकारी महापौरांची दिशाभूल करत आहेत. असे सांगत पावसाला विलंब झाला ही मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी असे आवाहन केले.



सध्या पाणी टंचाई जाणवत असल्याने पालिकेकडून १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. कपात करणे हे ठीक आहे. मात्र पाण्याचा प्रेशर कमी का केला जातो? त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित नसल्याबाबतची नाराजी त्यांनी केली. मुंबईत जवळपास ७० टक्के रस्ते काँक्रिटीकरण झाले असतांनाही, सभागृहात खड्डे भरण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. जर रस्ते झाले, तर मग खड्डे भरण्याचा प्रस्ताव कशासाठी असा सवालही किल्लेदार यांनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता