Deool Band 2 : 'देऊळ बंद २'ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; २३ दिवसांत ६५ कोटींचा टप्पा पार, १०० कोटींच्या दिशेने वाटचाल

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला देऊळ बंद २ (Deool Band 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू असून, अजूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Deool Band 2 Box Office Collection)


हा चित्रपट २१ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ तीन आठवड्यांतच विक्रमी कमाई केली असून आता १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्वामी भक्ती, अध्यात्म आणि शेतकऱ्यांच्या वेदना यांचा प्रभावी संगम असलेल्या या चित्रपटाला ग्रामीण तसेच शहरी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने २३ व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शुक्रवारी १.२७ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन ६५.०२ कोटी रुपये, तर भारतातील ग्रॉस कलेक्शन ७६.३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई कायम असल्याने येत्या वीकेंडला आणखी मोठी झेप घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


चित्रपटाच्या यशानिमित्त प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीम महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांना सरप्राईज देत आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


चित्रपटात स्वामींची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भूटकर, संस्कृती बालगुडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या प्रभावी भूमिका आहेत.


मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'देऊळ बंद २' हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठतो का याकडे संपूर्ण उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी