Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या अपघातात पारोळ गावातील उद्योजक, शेतकरी रवींद्र गोपाळ पाटील (Ravidra Patil) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वसई आणि पारोळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Palghar Accident)



प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र पाटील हे आपल्या दुचाकीवरून पारोळहून शिरसाडकडे जात होते. शिरसाड नाका परिसरात त्यांच्या पुढे धावणाऱ्या एका हायवा टिपिंग ट्रकने कोणताही इंडिकेटर न देता अचानक डावीकडे वळण घेतले. ट्रक अचानक आडवा आल्याने पाटील यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली.


अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, ट्रकच्या अवजड चाकाखाली चिरडल्याने रवींद्र पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर ओव्हरलोड रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अशा वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच मार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


रवींद्र गोपाळ हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र यांच्या जाण्याने राजकारणात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या