Surat Police Rescue Viral Video : सुरत पोलिसांचे धाडस! सातव्या मजल्यावरून बाल्कनीत प्रवेश करत वाचवले तरुणाचे प्राण

सुरत : गुजरातमधील सुरत पोलिसांच्या (Surat Police) तत्परता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लस्काना परिसरातील सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये (Flat) स्वतःला कोंडून घेतलेल्या तरुणाने आत्महत्येचा (Sucide) प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळताच डायल ११२ आणि पीसीआर पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


मात्र फ्लॅट (Flat) आतून बंद असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. अशावेळी पोलीस कॉन्स्टेबल शैलेश चुडासमा यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घातला. इमारतीच्या बाहेरील ग्रिलचा आधार घेत त्यांनी सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून (Balcony) फ्लॅटमध्ये प्रवेश केला.



फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर त्यांनी पाहिले की संबंधित तरुणाच्या हातात एका द्रव पदार्थाची बाटली होती. तो बेडवर (Bed) बसलेला असून त्याने विषारी पदार्थ प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ त्याच्या हातातील बाटली हिसकावून घेतली आणि विलंब न करता त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुरत पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानसिक तणावामुळे संबंधित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनीही सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ (Video) शेअर करत सुरत पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, "मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला नवजीवन देण्यासाठी सुरत पोलिसांच्या पीसीआर पथकाने दाखवलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा प्रशंसनीय आहे. डायल ११२ पथक आणि अग्निशमन दलाच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे एका तरुणाचे प्राण वाचले असून या धाडसी बचाव मोहिमेची राज्यभर चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी