Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी असेल. IRCTC वरून जास्तीत जास्त साठ दिवस आधी रेल्वेचे ऑनलाईन रिझर्व्हेशन करता येते. यामुळे ११ सप्टेंबरसाठीचे ऑनलाईन रिझर्व्हेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळातील गाड्या फुल होण्याची गॅरेंटी असल्यामुळेच कोकण रेल्वे विशेष गाड्यांच्या नियोजनाची तयार करत असल्याचे समजते.





जुलैपासून सुरू होणार आरक्षण


भारतीय रेल्वेच्या आगाऊ आरक्षण नियमांनुसार सप्टेंबरमधील प्रवासासाठी तिकीट बुकिंग जुलै महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छित तारखेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांनी आरक्षणाच्या तारखांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यंदा 17 सप्टेंबरला गौरी आगमन आणि 18 सप्टेंबरला गौरी पूजन होणार असल्याने या कालावधीतही कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसांसाठीही रेल्वे तिकिटांची मोठी मागणी असू शकते.



विशेष गाड्यांची प्रतीक्षा


दरवर्षी नियमित गाड्यांमधील तिकिटे काही मिनिटांत संपत असल्याने अनेक प्रवाशांना विशेष गणपती स्पेशल गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. यंदाही रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.



कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सल्ला


1. गणेशोत्सवासाठी प्रवास करणार असाल तर आरक्षणाच्या तारखा लक्षात ठेवा.


2. 11 ते 13 सप्टेंबरदरम्यानच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी राहण्याची शक्यता.


3. कन्फर्म तिकीट हवे असल्यास बुकिंग सुरू होताच आरक्षण करा.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक