Ashwini bhide : नगरसेवकांच्या सहभागातून आता विहिरींमधील पाण्याचा वापर

 

महापालिका आयुक्त भिडे यांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे निर्देश


 

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठ्यात घट झाली आहे . हवामान खात्यानेही यंदा पाऊस उशिरा दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था उभारावी. स्थानिक नगरसेवकांच्या सहभागातून विहिरींच्या परिसरातील गृहनिर्माण संस्थांशी समन्वय साधून या विहिरींतील पाण्याचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.



मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक गुरुवारी ११ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्‍त (वाहतूक) सत्‍य नारायण चौधरी, उपायुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.



महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्‍यक आहे. वाढती लोकसंख्या आणि हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय आणि खासगी विहिरी तसेच कूपनलिकांची अद्ययावत माहिती सर्व प्रशासकीय विभागांंच्‍या (वॉर्ड) सहायक आयुक्‍तांनी संकलित करावी. विहिरींची दुरुस्ती करताना त्या वापरात येतील याची खात्री करावी. खासगी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्‍याचा वापर करावा. यासाठी स्‍थानिक नगरसेवक, प्रशासन आणि गृहनिर्माण संस्था यांनी समन्वय साधावा, असेदेखील भिडे यांनी नमूद केले.
Comments

Shashikant Oak    June 13, 2026 01:30 PM

रहिवाशांनी, आपल्या गाड्या शक्यतो, बोअरवेल च्या पाण्याने फक्त पुसाव्यात, धूऊ नयेत.

Add Comment

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या

Uday Samant : चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार; मंत्री उदय सामंत

मुंबई : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे