India U19 : राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड

MUMBAI : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा 'द्रविड' आडनावाचा दबदबा पाहायला मिळणार आहे. भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा १७ वर्षीय मुलगा, अन्वय द्रविड याची भारताच्या १९ वर्षांखालील (U19) संघात निवड करण्यात आली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) अधिकृत संघाची घोषणा केली असून, या निवडीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ


अन्वय द्रविडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. विनू मांकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना त्याने आपली छाप पाडली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने अत्यंत दबावाच्या परिस्थितीत हिमाचल प्रदेशविरुद्ध ८२ धावांची नाबाद 'मॅच विनिंग' खेळी साकारली होती. त्याआधी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या पहिल्या शतकासह गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली होती.



श्रीलंका दौरा: असे आहे वेळापत्रक आणि संघ


भारतीय १९ वर्षांखालील संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ४ जुलै २०२६ रोजी हंबनटोटा येथे होणार असून, यामध्ये तीन वन-डे आणि दोन चार दिवसीय (Multi-day) सामने खेळवले जाणार आहेत.



निवड समितीने जाहीर केलेले संघ खालीलप्रमाणे आहेत:





  • वन-डे (One-Day) संघ: यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, विनीथ व्ही के., अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल, अन्वय द्रविड, अनमोलजीत सिंग, वुतकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शविन व्ही, काव्य परेश पटेल, मोहीत उलवा आणि इशान सूद.




  • चार दिवसीय (Multi-day) संघ: यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, पटेल कुश, मनल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा, आर्यन सकपाळ, एच. जे., किशोर, रोहित यादव, काव्य पटेल, प्रियांशू सिंग, प्रणव राघवेंद्र आणि चिंगुरुपती वेंकटा.







भारतीय क्रिकेटसाठी नवी आशा


राहुल द्रविडचा वारसा अन्वय पुढे नेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यशवर्धन सिंग चौहानच्या नेतृत्वाखालील हा तरुण संघ श्रीलंकेच्या भूमीवर भारताची मान उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्वयच्या या निवडीमुळे भारतीय क्रिकेटच्या 'नेक्स्ट जनरेशन'मध्ये एक आश्वासक चेहरा समोर आला आहे.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे