Nashik : नाशिककरांसाठी मोठी बातमी, ‘मेट्रो निओ’ जवळपास गुंडाळली; आता नाशिकमध्ये धावणार नियमित मेट्रो?

Nashik : नाशिककरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि प्रत्यक्षात मात्र रखडलेला ‘टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्प’ आता जवळपास गुंडाळला जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आता या प्रकल्पाऐवजी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर नियमित मेट्रो (Metro ) सुरू करण्याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याबाबत आज म्हणजेच बुधवारी, १० जून रोजी नगरविकास विभागात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नाशिकमध्ये पारंपरिक मेट्रो प्रकल्प (Metro Project) राबवण्याच्या शक्यतांवर चर्चा होणार असल्याने नाशिककरांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.



नियमित मेट्रोकडे प्रशासनाचा कल का वाढला ?


मेट्रो प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे प्रति तास किमान २० हजार प्रवासी संख्या असणे अपेक्षित असते. याआधी नाशिकमध्ये ही संख्या कमी असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे शहरासाठी ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ (Tire-based Metro Neo) हा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असल्याचा दावा केला जात आहे. महामेट्रोने तयार केलेल्या नव्या वाहतूक आराखड्यानुसार नाशिकमध्ये प्रति तास २० हजारांहून अधिक प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने ‘मेट्रो निओ’ (Metro Neo) ऐवजी नियमित मेट्रोचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे.


‘महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन टायरबेस मेट्रो’ऐवजी नियमित मेट्रोच्या अनुषंगाने नाशिक शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सदरचा नाशिक शहराचा आराखडा ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या संस्थेकडे सादर करण्यात आला. यानुसार आता ‘टायरबेस्ड मेट्रो’ऐवजी मुंबई, पुणे, नागपूरच्या पारंपरिक मेट्रोसाठीची चाचपणी नाशिक शहरात सुरू करण्यात आली आहे.



आठ वर्षांपासून मेट्रोची केवळ चर्चा; प्रत्यक्षात काम शून्य


नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) २०१६ मध्ये शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ते विकास, मालवाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित वाहतूक व्यवस्थेचा समावेश करण्यात आला होता. याच आराखड्याच्या आधारे पुढे नाशिकसाठी ‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल २,१०० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी मिळाली होती. पण, आठ वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प प्रत्यक्षात न आल्याने आता पर्याय म्हणून नियमित मेट्रोची चर्चा सुरू झाली आहे.



आजच्या बैठकीत कोण असणार उपस्थित ?


नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंग पाटील यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीत सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत नाशिकमध्ये नियमित मेट्रो शक्य आहे का? त्यासाठी कोणत्या सुविधा, किती निधी आणि कोणता आराखडा आवश्यक असेल? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.



नाशिककरांच्या मनात आता एकच प्रश्न


गेल्या आठ वर्षांपासून नाशिककरांना ‘मेट्रो निओ’ची स्वप्न दाखवली गेली. मात्र, आता अचानक नियमित मेट्रोची चर्चा सुरू झाल्याने शहराच्या वाट्याला नेमकी कोणती मेट्रो येणार? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. आता प्रशासनाच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले असून, या बैठकीतून नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचा भविष्यातील मोठा निर्णय समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर