Nashik Cyber Crime : एका कोडने WhatsApp हॅक ! ‘कॉल फॉरवर्डिंग’चा नवा सापळा उघड; सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला गंडा

Nashik Cyber Crime : देशाच्या सीमेवर वर्षानुवर्षे सेवा बजावून परतलेल्या एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यालाच सायबर भामट्यांनी (Cyber Crime) आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात समोर आली आहे. ‘पार्सल डिलिव्हरी’च्या (Parcel Delivery) बहाण्याने फक्त एक कोड डायल करायला लावून WhatsApp हॅक करण्याचा अत्यंत धोकादायक आणि नवा सायबर ट्रॅप (Cyber ​​Trap) या घटनेतून उघडकीस आला आहे. या फसवणुकीत तब्बल ७८ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.



सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


देवळाली कॅम्पमधील हिलवूड सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कमलेश विश्वविनायकसिंग चौहान (वय ६१) यांनी याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.



एका कोडने WhatsApp हॅक


मिळालेल्या माहितीनुसार, चौहान यांना स्वतःला ‘ब्लू डार्ट कुरिअर’ कंपनीचा प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तीने फोन केला. “तुमचा पत्ता सापडत नाही, एक कोड डायल करा म्हणजे लोकेशन मिळेल,” असे सांगून संबंधिताने त्यांना मोबाईलवर एक कोड डायल करण्यास सांगितले. कोणताही संशय न आल्याने चौहान यांनी तो कोड डायल केला आणि इथूनच सायबर जाळ्याची सुरुवात झाली.



अन थेट कॉल फॉरवर्डिंग’ सक्रिय


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा कोड प्रत्यक्षात ‘कॉल फॉरवर्डिंग’ सक्रिय करणारा होता. कोड डायल होताच चौहान यांच्या मोबाईलवर येणारे कॉल आणि एसएमएस थेट सायबर चोरट्याच्या क्रमांकावर वळवले गेले. याचाच फायदा घेत भामट्याने चौहान यांचे WhatsApp आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले. व्हेरिफिकेशनसाठी येणारा OTP थेट भामट्यालाच मिळाल्याने WhatsAppचा ताबा काही क्षणांतच गेला.



मित्रमंडळींना आणि लष्करी अधिकाऱ्यांना मेसेज


WhatsApp हॅक होताच भामट्याने चौहान यांच्या प्रोफाईलवरून त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना आणि लष्करी अधिकाऱ्यांना तातडीने पैशांची गरज असल्याचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. मेसेज स्वतः चौहान यांनीच पाठवला असल्याचा विश्वास बसल्याने काही मित्रांनी कोणतीही खात्री न करता पैसे ट्रान्सफर केले.
देवळालीतील डॅनियल मेन्सी यांनी २३ हजार रुपये, तर लेह (लडाख) येथे कार्यरत कर्नल क्षितिज चौहान यांनी ३५ हजार रुपये संबंधित यूपीआय आयडीवर पाठवले. इतर व्यवहारांसह एकूण ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.



​सायबर पोलिसांचा इशारा


या घटनेनंतर नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. मोबाईलवर अनोळखी व्यक्ती सांगेल तो 401 किंवा तत्सम कोड कधीही डायल करू नका. हा ‘कॉल फॉरवर्डिंग’चा सापळा असू शकतो. तसेच WhatsAppवर मित्र किंवा नातेवाईक अचानक पैशांची मागणी करत असल्यास आधी त्यांना थेट फोन करून खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


दरम्यान, लष्करी अधिकाऱ्यांनाही गंडा घालणारी ही टोळी नेमकी कोण, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता नाशिक सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली