Mrunaltai Gore flyover : मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तरीही , काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.



महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मंगळवारी ९ जून २०२६ रोजी सायंकाळी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.


स्थानिक नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


महापौर तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली.



संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो, तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.



सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तरीही लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि