IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारताच्या युवा डावखुऱ्या फिरकीपटू मानव सुथारला मोठी संधी मिळाली आहे. दमदार कामगिरीनंतर मानवला आता इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबत (Warwickshire County Cricket Club) अल्पकालीन करार केला आहे.



इंग्लंड क्रिकेटमध्ये खेळणार ?


मानव सुथार प्रथमच काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंडमधील वॉरविकशायर क्लबने अधिकृत निवेदनात सांगितले की,मानव पुढील दोन फेऱ्यांसाठी संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.काउंटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या वॉरविकशायरला मानवकडून मोठ्या अपेक्षा आहेत.मानव सुथार 12 ते 15 जूनदरम्यान यॉर्कशायरविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर तो समरसेटविरुद्धच्या सामन्यातही संघाकडून मैदानात उतरू शकतो.



देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार आकडे


मूळचा राजस्थानचा असलेला मानव सुथार आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने १३६ विकेट्स आणि ९७३ धावा केल्या आहेत. त्याने सात डावात पाच विकेट्स मिळवल्या आहेत. तीन वेळा त्याने सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक देखील आहे.भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दोऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन सामने खेळले जाणार आहेत. हे दोनही सामने ICC World Test Championship चा भाग असणार आहेत. यामुळे हे सामने ICC TEST RANKING च्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय पदार्पणानंतर मानव सुथारने श्रीलंका दौऱ्यासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.पदार्पण कसोटीत 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटची संधी यामुळे मानव सुथारची कारकीर्द सध्या वेगाने उंच भरारी घेताना दिसत आहे.

Comments
Add Comment

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी