Manmad : उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू ? गुन्हा दाखल करण्याची मागणी

Manmad : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या उपचारांमुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रमाबाई नगर येथील रहिवासी आशा संजय संसारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.


तक्रारीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता मनमाड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या घराची भिंत कोसळून त्यांच्या घरावर पडली. या दुर्घटनेत आशा संसारे आणि त्यांचे पती संजय संसारे हे दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली.



जखमी संजय संसारे यांना तातडीने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज शिंदे यांनी रुग्णाची आवश्यक तपासणी न करता केवळ डोक्यावरील जखमेवर पट्टी बांधून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


तसेच, रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्यात आला असता रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ती वेळेत पोहोचली नाही. काही खासगी रुग्णवाहिकांनी देखील रुग्ण नेण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकारात गंभीर जखमी रुग्णाला वेळेत योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत डॉ. योगीराज शिंदे तसेच संबंधित रुग्णालय कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशा संसारे यांनी केली आहे.


दरम्यान, या तक्रारीमुळे उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन