मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.मात्र, रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत रोहित खेळणार की नाही ? अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या रंगली आहे.आयपीएल 2026 दरम्यान पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकला काही सामने गमवावे लागले होते.त्यानंतर 2 जूनपासून तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी झाला होता.फिटनेस चाचण्यांदरम्यान हार्दिकने 10 षटकांचा पूर्ण गोलंदाजी स्पेल टाकत आपली फिटनेस सिद्ध केला.स्पोर्ट्स सायन्स टीमने त्याला पूर्णपणे फिट घोषित केले आहे. हार्दिकने मार्च 2025 नंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही आहे. यामुळे ही मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
MEXICO: २०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे वारे आता जगभरात वाहू लागले असून, स्पर्धेपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यांमध्ये दिग्गज संघांनी आपल्या ...
रोहित शर्माबाबत अद्याप सस्पेन्स
स्टार फलंदाज रोहित शर्मा अद्याप हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरत आहे.आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तो सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब प्रक्रियेत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. फिटनेस चाचणी पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितले जात आहे.
Dambulla, Sri Lanka: श्रीलंकेतील रंगिरी दंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालेल्या 'त्रिराष्ट्रीय अ' मालिकेच्या सलामीच्या सामन्यात भारत 'अ' संघाने शानदार ...
अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे: 13 जून – धर्मशाला
दुसरा वनडे: 17 जून – लखनौ
तिसरा वनडे: 20 जून – चेन्नई




