Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र


मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वाटपाची कार्यवाही १ जून २०२६ पासून महानगरपालिकेच्‍या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफीस) सुरू झाली आहे. एकूण ९९ हजार ४३५ पैकी २० हजार नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित नोंदणीकृत पथविक्रेत्‍यांनी २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करावी. तसेच, क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्राप्‍त करून घ्‍यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.



बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २६ विभाग कार्यालयात एकूण ९९,३४५ फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्‍याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित सर्व विभाग कार्यालयात नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी नावासह प्रदर्शित करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकीय विभागातील लोकप्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी, निवडून आलेले पथविक्रेता प्रतिनिधी यांना सुध्दा संबंधित यादी वितरीत करण्यात आली आहे. त्‍यानुसार, नोंदणीकृत पथ विक्रेत्यांना नोंदणी अर्जावरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांना प्रशासकीय विभाग कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. तसेच, पडताळणी करून क्यूआर कोड आधारीत ओळखपत्र प्राप्‍त करण्‍याचे सूचित करण्‍यात आले आहे.



गेल्या ८ जून २०२६ पर्यंत एकूण ९९ हजार ४३५ पैकी २० हजार नोंदणीकृत पथविक्रेत्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी दिनांक २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करावी. नोंदणीकृत पथ विक्रेत्यांनी  अर्जाची पोचपावती, आधारकार्ड मूळ प्रत आणि दोन पारपत्र आकाराची छायाचित्रे समवेत आणावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्‍यात येत आहे. विहित मुदतीनंतर पडताळणी अथवा क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करता येणार नाही, असेदेखील महानगरपालिका प्रशासनामार्फत स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ