BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. मंत्रालय डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की म्हटले आहे कि, मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेली महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालतो व मुंबईशी निगडीत असलेल्या समस्या मांडण्यासाठी या मुख्यालयात दररोज हजारो नागरिक, मान्यवर व्यक्ति, नगरसेवक व लोक प्रतिनिधी येत असतात.या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेबाबत मी पुन्हा एकदा आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रवेशद्वारावरती प्रवेश करत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंत्रालयाच्या डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे..




मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर २६.११.२००८ सारखी घटना सुध्दा घडली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वाराची सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि