Babasaheb Patil : गटसचिवांच्या न्याय्य मागण्यांवर कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ

मुंबई, दि. ९ जून : राज्यातील गटसचिवांच्या सेवा विषयक प्रश्न वेतन थकीत देयके तसेच जिल्हा संवर्गाच्या पुनर्रचनेसंदर्भातील विविध मागण्यांवर कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊअसे
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गटसचिव संघटनेच्या प्रतिनिधींनीच्या सेवा व वेतनासंदर्भा बैठक संपन्न झाली.




सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, गटसचिव हे सहकार व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहे. शेतकऱ्यांना आवश्यक सेवा, खत वितरण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
पॅक्स संस्थांमार्फत व्हावी.शेतकरी पॅक्समध्ये आल्यावर त्याचे काम तात्काळ झाले पाहिजे तसेच शासनाकडून गोडाऊन कार्यालयीन सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका आहे मात्र संस्थांनीही आपले कामकाज सक्षमपणे सुरू ठेवले पाहिजे.



जिल्हा देखरेख सहकारी संस्थांच्या रचनेत आवश्यक बदल चेअरमन व सहकार विभागाचा समन्वय अनुकंपा नियुक्ती सेवा नियमांमधील सुधारणा आणि गटसचिवांच्या वेतनासाठी स्थिर आर्थिक व्यवस्था उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून .यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल असेही बैठकीत सांगितले
यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ पॅक्स संस्थांमार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. खत व्यवसायासह विविध सेवा सहकारी संस्थांनी सक्षमपणे राबविल्यास सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
बैठकीस राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुनील कांबळे, प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव संतोष पाटील तसेच सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शासन गटसचिवांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय स्तरावर अभ्यास करून व्यवहार्य तोडगा काढला जाईलअसेही बैठकीत सांगितले

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि