एनडीए - २ परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यूपीएससीचे सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘नेवल अकॅडमी’ परीक्षा (२) २०२६ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा ९ जून रोजी शेवटचा दिवस आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीचे अधिकृत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे.एनडीएच्या परीक्षेसाठी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील तसेच देशभरातील अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी यूपीएससीने अर्ज भरण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. उमेदवारांनी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून यूपीएससीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीची वेबसाईट अत्यंत संथ गतीने चालत असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. सर्व्हर योग्य रीतीने काम करत नसल्यामुळे एका विद्यार्थ्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल 1 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.


अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी यूपीएससीने दिलेला 'हेल्पलाईन डेस्क नंबर' देखील लागत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील सायबर कॅफेमध्ये तासंतास बसूनही शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अपूर्ण राहिले आहे. संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एनडीए ही देशातील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, ही परीक्षा वर्षभरातून दोन वेळा (एप्रिल आणि सप्टेंबर) घेतली जाते. भारतातून साधारण ५ ते ६ लाख विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला अर्ज करतात. या वेळची राष्ट्रीय पातळीवरील लेखी परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर एकाच दिवशी घेतली जाणार आहे. आता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यूपीएससी मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक