Yeola : सावरगाव येथील घरकुल घोटाळा उघड; तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह ४ जणांवर येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Yeola News : येवला तालुक्यातील सावरगाव (Savargaon) येथे प्रधानमंत्री आवास योजनेत झालेल्या मोठ्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी (Housing scam) अखेर प्रशासनाला जाग आली असून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावरगाव येथील एका आदिवासी भिल्ल कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात गेल्या पाच दिवसांपासून येवला येथे आमरण उपोषण सुरू होते.


या उपोषणाला आज भिल्ल समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. उपोषणाचा पाचवा दिवस उजाडल्याने आणि भिल्ल समाज आक्रमक होऊन आंदोलन उग्र होण्याच्या भीतीने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. अखेर प्रशासनाने नमते घेत या प्रकरणातील मुख्य दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल केले असून, यामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.



सावरगाव येथील घरकुल घोटाळा उघड


सावरगाव ग्रामपंचायत (Savargaon Gram Panchayat) हद्दीत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) ७२ लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला होता. यामध्ये गावातील रहिवाशी सुनील भिकाराम तिवारी या अपात्र व्यक्तीला सर्व नियम धाब्यावर बसवून लाभ देण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबंधित लाभार्थ्याकडे आधीच गावठाण हद्दीत दुमजली घर आणि दोन ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असतानाही हा लाभ देण्यात आला. विशेष म्हणजे, हे घरकुल शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आले असून, त्यासाठी शासनाचे १,२०,००० रुपये आणि रोजगार हमी योजनेचे २७,७६८ रुपये, असे एकूण १,४७,७६८ रुपयांचे अनुदान लाटून शासनाची थेट फसवणूक करण्यात आली आहे.



प्रशासनाची दिशाभूल


या संपूर्ण प्रक्रियेमध्ये घरकुल कामाचा आराखडा तयार करणे, स्थळ पाहणी करणे आणि 'जीईओ टॅग' (Geo-Tag) फोटो काढण्याची जबाबदारी येवला पंचायत समितीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीमती दिपाली चंदू आढाव यांच्यावर होती. मात्र, त्यांनी कर्तव्यात कसूर करत वस्तूस्थितीशी विसंगत आणि बनावट जीईओ टॅग फोटो अपलोड करून प्रशासनाची दिशाभूल केली. तसेच, सावरगावच्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांनी कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता, अटी व शर्तींचे उल्लंघन करून या अपात्र लाभार्थ्याला मंजुरी दिली आणि शासकीय निधीचा अपहार करण्यास मदत केली.



सरपंच, ग्रामसेवकासह ४ जणांवर गुन्हा दाखल


या गंभीर भ्रष्टाचाराविरोधात आदिवासी कुटुंबाने प्रशासकीय अन्यायाविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसले होते. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच, भिल्ल समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे यांनी उपोषण स्थळी भेट दिल्याने आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सावरगावचे विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी राहुल शांताराम पगारे यांच्या लेखी तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलिसांनी तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिपाली आढाव आणि लाभार्थी सुनील तिवारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब विठ्ठल दिघे करत आहेत.

Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई