England BenStokes News: नाईटक्लब, मध्यरात्र अन् पुन्हा इंग्लंडचा कर्णधार; लॉर्ड्समधील विजयानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये खळबळ;नेमकं घडलं काय?

इंग्लंड :लॉर्ड्स कसोटीत मिळालेल्या विजयाच्या आनंदा वेळी इंग्लंड संघाला मोठ धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन हे रात्री उशिरा एका नाईटक्लबमध्ये गेले होते. ते दोघे रात्रभर नाईटक्लबमध्ये होते, अशी माहिती समोर आल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. दोघांच्या विरुद्धात संघाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे. तर इंग्लंड बोर्डाने हा प्रकरण स्वतंत्र क्रिकेट नियामकाकडे सोपवला आहे.त्यामुळे आता या दोघांबाबत कोणता निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य लागले आहे.



नेमकं नाईटक्लबमध्ये घडलं काय?


मिळालेल्या माहितीनुसार,न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे बेन स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन एका नाईटक्लबमध्ये होते.ते दोघेही रात्रभर क्लबमध्ये असल्याचे सांगीतले जात आहे. याच ठिकाणी कथित वादग्रस्त प्रकरण झाल्याचे समोर आले आहे. मात्र घटन्या बाबत अद्याप काही स्पष्टता सांगण्यात आली नाही आहे. संघाच्या कर्फ्यू नियमांचे किंवा नाईटक्लबच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ECB कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.यामुळे आता क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Sports)



घटनेचा परिणाम कसोटी मालिकेवर होणार ?


या प्रकरणाचा थेट परिणाम आगामी मालिकेवर होण्याची शक्यता आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रकरणाची दखल घेत. दुसऱ्या कसोटी सामन्याचे संघाची घोषणा पुढे केली आहे.स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांनी संघाच्या शिस्तभंगाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे का,याचा सध्या तपास सुरू आहे. जर चौकशीत स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन दोषी मिळाले तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. याचा थेट परिणाम संघावर होईल. इंग्लंड क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरील वादांची ही पहिली घटना नाही. गेल्या काही वर्षांत खेळाडूंच्या वर्तनामुळे बोर्डाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. काही काळापूर्वीच अॅशेस मालिकेपूर्वी मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे एका नाईटक्लबमध्ये वादात अडकला होता. त्यावेळी एका बाऊन्सरने त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्या वेळी जेकब बेथेल आणि जोश टंग हेही त्याच्यासोबत होते. या घटनेनंतर ECB ला खेळाडूंवर मध्यरात्रीनंतर बाहेर जाण्यासंबंधी कडक निर्बंध आणि कर्फ्यू लागू करावा लागला होता.



स्टोक्स पुन्हा नाईटक्लब वादात ?


बेन स्टोक्ससाठी हा प्रकरण काही नवीन नाही आहे. याआधीही तो 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यानंतर ब्रिस्टलमधील एका नाईटक्लबबाहेर झालेल्या रस्त्यावरील भांडणप्रकरणी अडकला होता.त्यावेळी त्याला स्टोक्सला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.या घटनेमुळे त्याच्या करियरवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला होते. इंग्लंड क्रिकेटला ही मोठा अपमान सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा नाईटक्लबशी संबंधित वादात त्याचे नाव समोर आल्याने इंग्लंड संघासह क्रिकेटविश्वातही चर्चा रंगल्या आहेत.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला