State Women's Commission issues : हिंदू विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगाचे पोलीस आयुक्तांना निर्देश !

नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ मधील हिंदू महिलांच्या धर्मांतराविषयी चौकशी अहवाल सादर करा !

मुंबई - नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या बहुराष्ट्रीय आयटी आस्थापनामध्ये हिंदू महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. असे असूनही या प्रकरणात आरोपींवर धर्मांतराचा गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ धार्मिक भावना दुखवणे आणि विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २० एप्रिल या दिवशी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून या अन्वेषणाविषयी संशय व्यक्त केला होता. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या पत्राची नोंद घेऊन या प्रकरणातील धर्मांतरणाच्या दृष्टीने अन्वेषण करून चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने नाशिकच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.


अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्रावरून राज्य महिला आयोगाने २३ एप्रिल या दिवशी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना याविषयीचे पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी राज्य महिला आयोगाने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पाठवली आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेने पत्रामध्ये व्यक्त केलेल्या संशयावरून ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे पत्रातील सूत्रांनुसार अन्वेषण करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारने १४ मार्च २०२६ या दिवशी धर्मांतरविरोधी कायदा संमत केला; परंतु ‘टी.सी.एस्.’मधील प्रकरणात नोंदवलेल्या ९ पैकी एकाही गुन्हात या कायद्याचा वापर केला गेला नाही. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचे धर्मांतर करण्यासाठी केलाला प्रयत्न स्पष्ट दिसत असूनही गुन्हा नोंदवतांना हे जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे का, असा संशय अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रामध्ये व्यक्त केला होता. योग्य कलमे न लावण्यामुळे आरोपींना पळवाटा मिळत आहेत, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.