Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार


मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ, महापूर आणि बाजारभावातील चढउतारामुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने अलीकडेच केली आहे. त्यानुसार, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील १० दिवसांत सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांनी सोमवारी दिली आहे.


महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ केले जाणार आहे. या महाकर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा प्रचंड आर्थिक भार पडणार आहे. बँका आणि सहकारी संस्थांकडून आलेली आकडेवारी आणि डेटा संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने, ३० जूनच्या आधी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. (Agriculture Minister Dattatreya Bharane)



कर्जमाफीच्या प्रक्रियेविषयी बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, ही योजना सर्वसमावेशक करण्यात आली आहे. केवळ थकबाकीदारांचेच कर्ज माफ होणार नाही, तर प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना या कक्षेत आणण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्यातील एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (Agriculture Minister Dattatray Bharne)



शेतकऱ्यांना बळ देणे ही नैतिक जबाबदारी :


गेल्या काही हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातच साखर उद्योगासमोरील अडचणींमुळे ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळण्यातही विलंब होत होता. अशा दुहेरी संकटात अडकलेल्या बळीराजाला संपूर्ण कर्जमुक्त करून पुन्हा उभे करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असे भरणे म्हणाले. या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे ठेवण्यात आले असून, भविष्यात तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही अशाच प्रकारे थेट लाभ देणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Agriculture Minister Dattatray Bharne)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने