Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन दुचाकी, एक टॅक्सी आणि ओला-उबेर वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Dadar Bus Accident)


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्लाझा परिसरात अचानक नियंत्रण सुटलेल्या बसने रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांना एकामागोमाग एक धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की काही दुचाकी दूरपर्यंत फेकल्या गेल्या, तर टॅक्सी आणि ओला-उबेर वाहनांचे मोठे नुकसान झाले. (Dadar Bus Accident)



अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले आणि तांत्रिक बिघाड होता का याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (Dadar Bus Accident)


या अपघातामुळे दादर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे दादर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (Dadar Bus Accident)




Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.