Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.


चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले की, एका तरुणाने एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडित मुलींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे.



पीडित मुलींच्या आई-वडिलांची व्यथा ऐकल्यानंतर आपण हादरून गेलो असल्याचे वाघ यांनी म्हटले. "दोन निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपीला कोणतीही दया दाखवता कामा नये. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधातही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. तसेच आरोपीचे घर अनधिकृत असल्यास त्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. (Chitra Wagh)



पालघरमध्ये वाढत्या फसवणुकीच्या घटनांबाबत चिंता :


चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पालघर जिल्ह्यात तरुणींना प्रेमाच्या आमिषाने परदेशात नेल्याच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली. काही प्रकरणांमध्ये तरुणींना शिक्षण किंवा नोकरीच्या नावाखाली परदेशात नेण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे मानसिक तणावातून जात असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.



लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट :


या वाढत्या घटनांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचेही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी स्पष्ट केले. "पीडित मुलींना न्याय मिळेपर्यंत आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून समाजातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेशी संबंधित विषय आहे," असे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि