Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक






सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येमागील सर्वांनाच हादरवून टाकणारं सत्य समोर आले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मृत अभियंत्याच्या जवळच्या नातेवाईकाला अटक करण्यात आले आहे. (Satara Murder)


मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ४५) हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सलग सुट्टी असल्याने ते ठाण्याहून कराडला घरी येत होते. शनिवारी पहाटे ते कराडमध्ये उतरून घराकडे जात असताना एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मंडले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कारने धडक दिल्यानंतर चालकाने वाहन पुन्हा मागे घेऊन मंडले यांच्यावर आणखी वारंवार गाडी चालवल्याचे दिसून आले. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती


तपासादरम्यान पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली. मंडले यांच्या पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार, या गुन्ह्यासाठी काही व्यक्तींना पैशांचे आमिष दाखवून काम सोपवण्यात आले होते.



घटनेच्या दिवशी मंडले यांनी कराडमध्ये पोहोचल्यानंतर पत्नीला फोन करून आपल्याला घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. याच माहितीच्या आधारे आरोपींना त्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.


या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नी सुरेखा मंडले आणि मेहुणा संग्राम चव्हाण यांना अटक केले. हल्ले करणारे दोन जण फरार झाल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे. त्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून विविध पुरावे गोळा केले जात आहेत.




















Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि