Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्ह्यातील रेल्वे पोलिसांनी दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी लोकल ट्रेनने घरी परतत असताना ही घटना घडली. ३० वर्षीय आरोपी हा अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.




 

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान या व्यक्तीने तरुणीसमोर अश्लील कृत्य केले आणि तिचा अयोग्यरीत्या स्पर्श केला. या घटनेनंतर लोकल ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.


कल्याण रेल्वे पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांडे यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 

पोलिसांनी आरोपीवर महिलेची लज्जा भंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे बळ वापरणे, लैंगिक छळ आणि महिलेच्या लज्जेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली कृती यांसारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)