Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.



सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.



किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.



कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :


आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.


विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची