Gold Smuggling : मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई, ५ कोटींचे सोने जप्त; ७ अटकेत

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन गोल्डन नेक्सस' अंतर्गत डीआरआयने केलेल्या या कारवाईत सुमारे ३.२ किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात विमानतळ कर्मचाऱ्यांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे.डीआरआयच्या माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय टोळीने सोन्याच्या तस्करीसाठी एक नवीन साखळी (रॅकेट) तयार केली होती. बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक आपल्या शरीरात हे सोने (वॅक्स स्वरूपात) लपवून आणत असत. विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम्स आणि सुरक्षायंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी ते विमानतळावरील स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत घेत असत.



एअरपोर्टचे कर्मचारीच निघाले तस्करांचे साथीदार


या कारवाईचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे तस्करांना मदत करणारे विमानतळावरील कर्मचारीच निघाले. यामध्ये बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिकांचा समावेश आहे, जे सोने वाहून आणण्याचे (कॅरिअर) काम करत होते. यामध्ये विमानतळावरील दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरचा समावेश आहे.



सोने स्वीकारणारा एजंट स्थानिक


मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने सापळा रचला होता. विमानतळ परिसरामध्ये दोन बस चालक आणि एक कोच मॉनिटर हे परदेशी नागरिकांकडून घेतलेली सोन्याची डिलिव्हरी स्थानिक एजंटला देत असतानाच अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.



पुढील तपास सुरू


डीआरआयने ही संपूर्ण सोन्याची जप्ती कस्टम्स कायदा, १९६२ अंतर्गत केली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी सोन्याच्या तस्करीची एक मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. हे सोने मुंबईत नेमकं कोणाला दिले जाणार होते आणि या मागे आणखी कोणती मोठी नावे आहेत, याचा सखोल तपास सध्या डीआरआयचे अधिकारी करत आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)