U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर


काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. १८-वर्षांखालील पुरुष आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला, तर १८-वर्षांखालील महिला संघाने कोरियावर ३-० अशी मात करत कांस्यपदाची कमाई केली. या दुहेरी यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करत त्यांच्या चमकदार कामगिरीचे कौतुक केले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. आशीष तानी पुर्तीने (२', २८', ३४') हॅट्ट्रिक साकारत जपानी बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडवली. संघाचा कर्णधार केतन कुशवाहाने (३०) आणखी एक गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. जपानकडून नुमादा गाकूने (५२') एकमेव गोल केला. भारताच्या वेगवान आक्रमण, अचूक पासिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर संघाने स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात पटकावले.




या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन करत म्हटले की, “आपल्या युवा हॉकीपटूंनी केलेली ही कामगिरी अत्यंत गौरवास्पद आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवले. अंतिम सामन्यातील विजय संस्मरणीय ठरला असून देशातील तरुणांमध्ये हॉकीची वाढती लोकप्रियता यामुळे अधोरेखित झाली आहे.”
दुसरीकडे, १८-वर्षांखालील महिला संघाने तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोरियाचा ३-० असा धुव्वा उडवत कांस्यपद पटकावले. संदीपा कुमारी (२), कर्णधार स्वीटी कुजूर (१६) आणि नौशीन नाझ (३३) यांनी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघाने ३६ गोलांची नोंद करत आपली आक्रमक क्षमता, भक्कम बचाव आणि उज्ज्वल भविष्याची झलक दाखवली.



महिला संघाच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, “भारतीय महिला १८-वर्षांखालील हॉकी संघाने संपूर्ण स्पर्धेत जिद्द, चिकाटी आणि संघर्षशील वृत्तीचे दर्शन घडवले. कांस्यपदाची ही कामगिरी भारतीय महिला हॉकीच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि युवा खेळाडूंच्या अफाट क्षमतेचे प्रतीक आहे.”
दरम्यान, दोन्ही संघांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हॉकी इंडियाने रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे. सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये, तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कांस्यपदक विजेत्या महिला संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
आशिया कपमधील या उल्लेखनीय यशामुळे भारतीय युवा हॉकीला नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचे अनेक आश्वासक खेळाडू तयार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला