IND vs AFG : गिल-राहुलच्या शतकांनी अफगाणिस्तानवर भारताची पकड मजबूत;पहिल्याच दिवशी 368/3

न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचेच वर्चस्व दिसले. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेर 3 विकेट्स गमावत 368 धावांचा डोंगर उभारला आहे. अफगाणिस्तानचे गोलंदाज पहिल्या दिवशी भारताला रोखण्यात पुरते अपयशी ठरले.



भारतीय संघाची फलंदाजी


भारतीय फलंदाजीची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली.दोघांनी सावध पण सकारात्मक फलंदाजी करत संघाला भक्कम पाया रचून दिला. मात्र यशस्वी 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सुदर्शनने 81 धावांची खेळी केली,पण शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.त्यानंतर दुसऱ्या बाजूने केएल राहुलने संयमी आणि दर्जेदार फलंदाजी करत शानदार शतक पूर्ण केले. राहुल 100 धावांवर बाद झाला, मात्र त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने जबाबदारी स्वीकारत आपल्या होम ग्राऊंडवर दमदार शतक झळकावले. ऋषभ पंतनेही आक्रमक अर्धशतक करत भारताची धावगती कायम ठेवली.


पहिल्या दिवशी भारताकडून केएल राहुलने १६५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या, तर साईने ८१ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने दमदार शतक झळकावत आपला आयपीएलमधील दमदार फॉर्म कायम ठेवला. ऋषभ पंतने ७० चेंडूंमध्ये ५० धावांची स्फोटक खेळी करत आपल्या खराब आयपीएल कामगिरीवर मात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत दोघेही पहिल्या दिवशी नाबाद राहिले. अफगाणिस्तानकडून सलीम साफीने दोन बळी घेतले, तर झियाउर रहमान शरीफीने राहुलला बाद केले. मात्र, अफगाण गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला.



राहुलसोबत नेमके घडले काय ?


राहुलच्या डावादरम्यान एक मोठा वादही पाहायला मिळाला. शरीफीच्या गोलंदाजीवर राहुलच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता.अफगाण खेळाडूंनी जोरदार अपील केले,मात्र पंचांनी नाबाद दिले.कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने डीआरएस घेतला नाही.नंतर रिप्लेमध्ये राहुल बाद असल्याचे स्पष्ट दिसून आले आणि अफगाणिस्तानने मोठी संधी गमावल्याचे समोर आले.दुसऱ्या दिवशी भारत मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार हे निश्चित.

Comments
Add Comment

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त