Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला. जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या सामन्यात भारतने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार पुनरागमन करत विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे.भारत तिसऱ्या क्वार्टरअखेर २-३ अशा पिछाडीवर होता. मात्र अखेरच्या 15 मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या डिफेएनसवर सतत दबाव निर्माण केला.या काळात भारताने तीन गोल करीत पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला.





आशिष तानीचा तुफान


या सामन्यात आशिष तानी पुर्ती हा भारताच्या विजयाचा खरा शिळ्पकार ठरला. त्याने एकहाती चांगली कामगिरी करत चार गोल केले.विशेष म्हणजे त्याने निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये हॅट्ररिक पूर्ण करत भारताचा विजय निश्चित केला. सामन्याच्या 12 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. तेव्हा आशिष तानी पुर्तीने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने जोरदार आक्रमण केले. 27 व्या मिनिटाला अदीलने शानदार गोल करत स्कोर 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये शाहरुख अलीने गोल करत भारताला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पाकिस्तानने तातडीने चांगली कामगिरी करत सामन्यात पुमरागमन केले. मुहम्मद फरहान असलम आणि उजैर अहमद कुरेशी यांच्या गोलमुळे पाकिस्तानने 3-2 अशी आघाडी घेतली.





अखेरच्या क्षणात भारताचा जलवा


सामन्याच्या 46 व्या मिनिटाला पाकिस्तानचा खेळाडू मुजम्मिल सईद याला ग्रीन कार्ड मिळाले आणि याचवेळी सामन्याची दिशा बदलली. भारताला सलग पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि 49 व्या मिनिटाला आशिषने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला.53 व्या मिनिटाला आशिषने आणखी एक गोल करत हॅट्रिक पूर्ण केली आणि भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली.सामना संपण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना त्याने आणखी एक गोल करत भारताला 5-3 अशी आघाडी मिळवत विजय मिळवून दिला. शेवटच्या मिनिटांत भारतीय संघाने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला आणि कट्टर विरोधक पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला.या विजयासह भारताने अंतिम फेरित धडक मारली. आशिया कप विजेतेपदासाठी सहा जून २०२६ ला Kawasaki Heavy Industries Hockey Stadium येथे भारात आणि जापानमध्ये लढत होणार आहे.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५