Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ


मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'च्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, स्वच्छ आणि दर्जेदार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची आता दर चार तासांनी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नियमित स्वच्छता केली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील सर्व बसस्थानके आणि बसेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांनी स्वच्छ करून ती प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले.


परळ बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी आणलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटी ही केवळ एक वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मोहीम प्रवाशांना एक नवा आणि आनंददायी अनुभव देईल." ही स्वच्छता मोहीम एक दिवसापुरती मर्यादित नसून, ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीवर आणि स्वच्छतेच्या दर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाईल, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.


प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन


पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रत्येक बसस्थानकावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या कचऱ्यात न टाकता त्या संकलित केल्या जाणार आहेत. हे प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार असून, या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याशिवाय प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छतेचे नियोजनबद्ध निरीक्षण केले जाईल आणि प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना व अभिप्रायांना (फीडबॅक) प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन्स


पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात ई-बसेसचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे भक्कम जाळे उभारण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास