Bal Mane : पदाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी देखील विनायक राऊत पैसे घेतात!

बाळ माने यांचा गंभीर आरोप; मी संघ स्वयंसेवक, कोकणहिताचा निर्णय घेणार


मुंबई : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उबाठा गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार बाळ माने यांनी आता या गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "कोकणात उबाठा गटाची वाट लावण्याचे काम विनायक राऊत यांनीच केले असून, ते स्वतःच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पत्र देण्यासाठी देखील पैसे घेतात," असा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी आपल्यावर केलेल्या 'गद्दार' या टीकेचा खरपूस समाचार घेताना, "पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळी 'फर्न हॉटेल'मध्ये एक मोठी डील झाली होती, त्यात तुम्ही नक्की किती पैसे खाल्ले हे आधी कोकणातील जनतेला सांगा," असे आव्हानच बाळ माने यांनी दिले आहे.



माध्यमांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले, "२०२४ च्या निवडणुकीतही विनायक राऊत यांना मला उमेदवारी द्यायची नव्हती, कारण त्यांना अन्य लोकांसोबत 'सेटिंग' करायची होती. काल ते डोमकावळ्यासारखे आले आणि माझ्यावर टीका करू लागले; पण त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकारच काय? मी जर काही चुकीचे केले होते, तर पक्षाने मला बोलावून वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. मात्र, विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 'भाट' झाले आहेत. कोकणात शिंदे सेनेला आव्हान देणारा सक्षम नेता उबाठा गटात त्यांना नको आहे, म्हणूनच त्यांनी माझ्या विरोधात शिंदे गटाची छुपी सुपारी घेतली आहे," असा गंभीर आरोप माने यांनी केला.




मी 'आरएसएस'चा स्वयंसेवक, फडणवीसांचा शब्द मानला


आपल्या माघारीमागचे कारण स्पष्ट करताना बाळ माने म्हणाले, "मी मूळचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे १९९० पासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. या निवडणुकीत मंत्री नितेश राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी संपर्क साधला. महाविकास आघाडीकडे केवळ ५५ मते असताना निवडणुकीत उभे राहून स्वतःचे राजकीय करिअर का संपवतोस? असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांच्या या शब्दाचा मान राखूनच मी माघार घेतली. फडणवीस यांनी मला सन्मानाने बोलावले तर मी निर्णय घेईन. आता यापुढेही मी फडणवीस यांचेच ऐकणार असून सत्ताधारी पक्षात राहून कोकणच्या हिताचे निर्णय घेणार आहे", असे माने यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Panvel ATM Fraud : पनवेलमध्ये ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपये लंपास

पनवेल : पनवेल शहरात ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचं