Nashik News : पर्यावरणदिनी नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, मंत्री गिरीश महाजनही झाले सहभागी

Nashik News : जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पार्श्वभूमीवर व 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत आज नाशिक शहरातील नंदिनी नदीच्या (Nandini River) किनारी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नाशिक (Nashik) शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, युवक संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योग , राजकीय तसेच माध्यम क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांनी सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला.


पुढील वर्षी नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होणार आहे. या पार्श्वभूमीवर आपले नाशिक शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार सौ. सीमा हिरे, महापौर सौ. हिमगौरी आडके, उपमहापौर श्री. विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सफाई करत असताना पिस्तूल सापडलं


दरम्यान नाशिकमधील उंटवाडी परिसरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) स्वतः सहभागी झाले होते. नदीपात्रातील गाळ, प्लास्टिक आणि इतर कचरा हटविण्याचे काम सुरू असताना अचानक नदीच्या तळाशी धातूची एक वस्तू आढळून आली. सुरुवातीला ती एखादी लोखंडी वस्तू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, जवळून पाहणी केल्यानंतर ती गंजलेल्या अवस्थेतील पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाले.


नदी स्वच्छतेसारख्या सार्वजनिक मोहिमेदरम्यान अशा प्रकारचे शस्त्र सापडल्याने उपस्थित नागरिक, अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. काही काळ घटनास्थळी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल ताब्यात घेतले आणि पंचनामा करून पुढील तपासासाठी जप्त केले आहे.

Comments
Add Comment

Independence Day Special : OTT वर पाहा 'हे' 6 देशभक्तीपर सिनेमे; अंगावर येईल काटा!

1. भारत भाग्य विधाता – ZEE5 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट कामा हॉस्पिटलमधील

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला