Nashik TCS Case : निदा खान प्रकरणाचा तपास खोलात; 'हा' माजी खासदार SIT च्या रडारवर ?

Nashik TCS Case : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमधील टीसीएस (TCS) लैंगिक छळ आणि कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आता नवे धागेदोरे समोर येत असून तपासाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांची विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंत तब्बल तीन वेळा कसून चौकशी केली आहे. या चौकशीमुळे आता राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.



इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर ?


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतीन पटेल यांच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि अन्य डिजिटल माहितीची तपासणी सुरू आहे. याच डेटाच्या आधारे तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा असून, या प्रकरणात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचे नावही चर्चेत आले आहे. एसआयटीकडून (SIT)  त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.



दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मुख्य दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या नव्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लवकरच पुरवणी दोषारोपपत्रही दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची चर्चा सुरू झाली आहे.



मतीन पटेलने आरोप फेटाळले


दुसरीकडे, निदा खानला राहण्यासाठी घर मिळवून दिल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले नगरसेवक मतीन पटेल यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “निदा खानला मी याआधी कधी भेटलो नव्हतो. तिचे आई-वडील कौटुंबिक अडचणीचे कारण सांगत मदतीसाठी माझ्याकडे आले होते. ती गर्भवती असल्याने मानवी दृष्टिकोनातून मी तिला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. यामध्ये कोणताही चुकीचा हेतू नव्हता.”



इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याच्या चर्चेवरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. “इम्तियाज जलील हे माझे राजकीय नेते आहेत. आमच्यातील फोनवरील चर्चा राजकीय आणि वैयक्तिक विषयांपुरतीच मर्यादित होती. निदा खान प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध नाही. माझ्या मोबाईलचे सर्व तपशील पोलिसांकडे उपलब्ध आहेत,” असा दावा त्यांनी केला.


मात्र, एसआयटीच्या हाती लागलेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे या प्रकरणाची दिशा आता कोणत्या वळणावर जाते, तसेच पुढील चौकशीत आणखी कोणती मोठी नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यभरात गाजत असलेल्या या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा; फेक चॅट्स, बनावट ओळख अन् १.३० लाखांचा व्यवहार

मुंबई : मुंबई पोलिसांनी सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या एका कथित खंडणीच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे . या

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची