Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल (Panel) हटवण्यासाठी ६ जून (शनिवार) ते ७ जून (रविवार) दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून ७ जून रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान राहणार असून त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरीय रेल्वे सेवांवर होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द करण्याचा, काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination) व शॉर्ट ओरिजिनेशन (Short Origination) करण्याचा, अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा तसेच काही गाड्यांचे मार्गांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.



या एक्स्प्रेस (Express) गाड्या राहणार रद्द


ब्लॉकमुळे ६ जून रोजी खालील चार गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.


- 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्स्प्रेस
- 11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
- 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
- 12110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस


शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन


ब्लॉकमुळे काही गाड्या नियोजित अंतिम स्थानकापर्यंत धावणार नाहीत.




  • शॉर्ट टर्मिनेशन


- 17611 हुजूर साहेब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (JCO 05.06.2026) मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
- 12072 हिंगोली डेक्कन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस (JCO 06.06.2026) नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.




  • शॉर्ट ओरिजिनेशन


- 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस (JCO 06.06.2026) मनमाड येथून सुटेल.
- 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस (JCO 06.06.2026) नाशिक रोड येथून सुटेल.



अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले




  • ब्लॉकमुळे खालील गाड्या उशिराने सुटतील:


12809: सीएसएमटी – हावडा मेल- 7 जून रोजी 01:20
12322: सीएसएमटी – हावडा मेल- 7 जून रोजी 01:30
11057: सीएसएमटी – अमृतसर एक्स्प्रेस- 7 जून रोजी 02:00
01079: सीएसएमटी – गोरखपूर विशेष- 7 जून रोजी 04:00
22177: सीएसएमटी – बनारस महानगरी एक्स्प्रेस- 7 जून रोजी 02:15
02141: सीएसएमटी – नागपूर विशेष- 7 जून रोजी 02:30
18029: एलटीटी – शालिमार एक्स्प्रेस- 7 जून रोजी 01:20
12167: एलटीटी – बनारस सुपरफास्ट एक्स्प्रेस- 7 जून रोजी 01:45
12141: एलटीटी – पाटलीपुत्र एक्स्प्रेस- 7 जून रोजी 02:00
12811: एलटीटी – हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेस- 7 जून रोजी 02:15
22538: एलटीटी – गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस- 7 जून रोजी 02:30


या गाड्यांचे मार्गांतर




  • खालील गाड्या कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे धावतील:


- 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्स्प्रेस
- 01027 दादर – गोरखपूर विशेष
- 15066 पनवेल – गोरखपूर एक्स्प्रेस
- 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्लारशाह एक्स्प्रेस


अन्य मार्गांतर


- 12131 दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस कल्याण – कर्जत – पुणे – साईनगर शिर्डी मार्गे धावेल.
- 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस कल्याण – कर्जत – पुणे – दौंड कॉर्ड – मनमाड मार्गे धावेल.


अप दिशेतील गाड्यांचे नियमन




- 01026 बलिया – दादर विशेष : कसारा येथे 1 तास 45 मिनिटे
- 18030 शालिमार – एलटीटी एक्स्प्रेस : इगतपुरी येथे 50 मिनिटे
- 12810 हावडा – सीएसएमटी मेल : इगतपुरी येथे 20 मिनिटे
- 20104 भटनी – एलटीटी सुपरफास्ट : भुसावळ विभागात 10 मिनिटे
- 11082 गोरखपूर – एलटीटी एक्स्प्रेस : भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार
- 22537 गोरखपूर – एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस : भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार
- 11062 जयनगर – एलटीटी एक्स्प्रेस : भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार
- 01080 गोरखपूर – सीएसएमटी विशेष : भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार
- 11203 नागपूर – मडगाव एक्स्प्रेस (06.06.2026) : भुसावळ विभागात 30 मिनिटे



लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती


ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान कोणतीही उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करून प्रवासाचे नियोजन करावे.


प्रवाशांनी काय करावे?


मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे ६ आणि ७ जून रोजी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती, वेळापत्रक आणि मार्ग याबाबत अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा.

Comments
Add Comment

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा" – संजय दिना पाटील यांना शिंदेंचा सल्ला

रोज अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर शिंदे यांनी व्यक्त केला संताप मुंबई : पत्रकारांबाबत केलेल्या

Vaibhav Sooryvanshi : वैभवसाठी बीसीसीआयचे खास नियम ! दौऱ्यात टीमसोबत राहता येणार नाही ?

Mumbai : भारतीय संघ या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, तिथे दोन सामन्यांची टी-२० मालिका (T-20 Series) होणार आहे.

Nashik : नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; आयुक्तालयात तीन नवे एसीपी, ग्रामीणला नवे डीवायएसपी

Nashik : राज्यातील पोलिस प्रशासनातील (Police Administration) महत्त्वाच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून अनेक महिन्यांपासून

MLA Pravin Darekar : पेसा भरतीत आदिवासी उमेदवार शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे का ? : आमदार प्रवीण दरेकर

मुंबई : पेसा (PESA) कायद्यांतर्गत आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करताना, स्थानिक आदिवासी उमेदवार

IND W VS BAN W : भारतीय महिला संघासाठी आज करो या मरो सामना; सामन्यात पराभव झाला तर वर्ल्ड कपमधून बाहेर !

मुंबई : भारतीय महिला (Indian Womens Cricket ) संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून २०२६ च्या टी२० विश्वचषकाची

Kalpana Kharat : भोंदू अशोक खरातच्या पत्नीला दिलासा, कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Kalpana Kharat : भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिला सिन्नरमधील कथित