Political Twist in Dharashiv : विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड! उबाठाचे ५ नगरसेवक भाजपसोबत, ओमराजेंना धक्का

धाराशिव : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात मोठा Political Drama पाहायला मिळाला. महाविकास आघाडीत बंडखोरी करत अर्ज दाखल केलेल्या उबाठा (UBT) गटाच्या पाच नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीतच भाजपच्या (BJP) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या डोळ्यांदेखत ही संपूर्ण घडामोड घडली.


महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर उबाठा गटातील पाच नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. या गटाचे नेतृत्व करणारे नगरसेवक राजाभाऊ (राजू) पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडखोर गट निवडणूक (Election) लढवण्यावर ठाम असल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने राजाभाऊ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर राजाभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.



निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्याचवेळी राजाभाऊ पवार आणि त्यांच्यासोबतचे उबाठा गटाचे पाच नगरसेवक भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ओमराजे यांच्या समोरच या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ऐनवेळी स्वतःच्या गटातील नगरसेवकांनी भाजपची साथ दिल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा Political Shock बसल्याची चर्चा रंगली आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार बसवराज पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडणुकीतील समीकरणे आणखी स्पष्ट झाली आहेत.

Comments
Add Comment

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Nashik Crime : 'ती' नव्हे तर फोनवरची व्यक्ती तृतीयपंथी निघाली, मॅट्रिमोनिअल ॲपवर डॉक्टरला11.86 लाखांचा गंडा, AI व्हॉईसच्या मदतीने...

Nashik Crime : नाशिकमध्ये मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून डॉक्टरची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली