Devendra Fadnavis : ५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून “मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व उपनगरांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर अंमलात आणली जाणार आहे. येत्या २५ जून २०२६ रोजी या मोहिमेचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते होणार असून, त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक मुंबईकर तब्बल ५००० ठिकाणी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत.महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले, हौसिंग सोसायट्या तसेच विविध

"> सामाजिक व धार्मिक संस्था या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.



या मोहिमेच्या तयारीसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियारजी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “व्यसनमुक्त मुंबई घडवणे हे सरकार, शासन, समाजाच्या सक्रिय सहभागातूनच हे शक्य होणार आहे. आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक लोकचळवळ आहे आणि यातून निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडेल.”या उपक्रमामुळे युवकांमध्ये जनजागृती वाढून अमली पदार्थांविरोधात मजबूत सामाजिक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.

Tags
mumbaimaharashtra governmentMangal Prabhat LodhaDevendra Fadnavissocial awarenessMumbai NewsDrug Free MumbaiAnti-Addiction CampaignPublic HealthYouth Empowerment
Comments
Add Comment

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६