Ahilyanagar : पोलीस बदल्यांचा ‘दरबार’! कुणाच्या चेहऱ्यावर आनंद, तर कुणाच्या डोळ्यांत अश्रू

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात (Ahilyanagar District Police Force) गुरुवारी प्रशासकीय बदल्यांचा मोठा ‘दरबार’ पार पडला. तब्बल 300 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस मुख्यालयात (Police Headquarter) करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत काहींना मनासारखं पोलीस ठाणं मिळाल्यानं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं, तर काहींना अपेक्षित ठिकाण न मिळाल्यानं नाराजी आणि भावनिक क्षणही समोर आले.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. प्रत्येक कर्मचाऱ्याशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची भूमिका, गरज आणि पसंती जाणून घेत बदल्या करण्यात आल्या. यासाठी यापूर्वीच पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांकडून तीन पसंतीच्या ठिकाणांचे अर्ज मागवण्यात आले होते.



कुणाच्या चेहऱ्यावर आनंद, तर कुणाच्या डोळ्यांत अश्रू


सकाळी साडेआठ वाजल्यापासून पोलीस मुख्यालयात सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रथम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि पोलीस हवालदार यांच्या बदल्या करण्यात आल्या. अनेक तपास अंमलदार गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असल्याने जिल्ह्याच्या काही भागांत मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे काही बदल्या पसंतीऐवजी रिक्त जागांचा विचार करून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान काही महिला पोलिसांच्या डोळ्यांत अश्रूही पाहायला मिळाले. तर पोलीस नाईक, शिपाई आणि चालकांच्या बदल्यांमध्ये पसंतीला प्राधान्य दिल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलं.



एलसीबीची इच्छा अपूर्णच


मात्र, स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीमध्ये बदली मिळावी अशी अनेकांची इच्छा होती. अर्जात पसंतीक्रमात एलसीबीचा समावेश असतानाही एकाही कर्मचाऱ्याला एलसीबीमध्ये बदली मिळाली नाही. त्यामुळे एलसीबीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक पोलिसांचा हिरमोड झाला आहे. सध्या केवळ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं असून, विनंती बदल्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Comments
Add Comment

Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

पाण्यात कोणता पदार्थ मिसळावा आणि हे पाणी प्यायल्याने काय फायदा होईल जाणून घ्या. तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरचे

Kalashtami 2026 : आज मासिक कालाष्टमी; भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

भगवान शिवाचे उग्र स्वरूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मासिक

Nashik Crime : 'डायल 112' वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी 'डायल 112' ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून

Jalgaon Accident : टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या

Forever Young Look : नेहमी चिरतरुण दिसायचंय? मग घरच्याघरी करा हे सोपे उपाय; त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी

मुंबई : वाढते वय थांबवता येत नसले, तरी योग्य जीवनशैली आणि त्वचेची नियमित काळजी घेतल्यास दीर्घकाळ चिरतरुण आणि

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन