Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्रा (टीबीएम) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्‍याचे कामकाज गतीने सुरू आहे. पहिल्‍या बोगदा खनन संयंत्राच्‍या जोडणीचे काम जून महिन्‍याच्‍या दुस-या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, दुस-या बोगदा खनन संयंत्राच्‍या जोडणीचे काम समांतरपणे वेगाने सुरू आहे.



महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या कामकाजाची आकस्मिक पाहणी केली . पहिल्‍या बोगदा खणन संयंत्राची संपूर्ण यंत्रणा प्रकल्‍पस्‍थळी स्थापित केल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्‍पस्थळ स्वीकृती चाचणी करण्‍यात येईल. यात प्रामुख्‍याने यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण व सुरक्षा प्रणालींची तपासणी करण्यात येईल. सर्व चाचण्या निर्धारित निकषांनुसार समाधानकारक आढळल्यावर प्रत्‍यक्षात बोगदा खोदकामास सुरूवात केली जाईल.



गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटरचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार दोन्‍ही बोगद्यांचे खोदकाम सुरू करून ऑक्‍टोबर २०२८ पूर्वी बोगद्यांचे खोदकाम पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍टय डोळयासमोर ठेवण्‍यात आले आहे. एकूणच, डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी